Pune Crime News | NDA मध्ये नोकरीच्या आमिषाने 28 लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | एन डी ए मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावतो, तसेच इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देतो, असे आश्वासन देऊन दोघांनी एकाची २८ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime News)

याप्रकरणी नर्‍हे येथील एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११७/२३) दिली आहे. त्यानुसार प्रसाद गोविंद वझे (रा. लक्ष्मी पार्क सोसायटी, खडकमाळ, कोंढवे धावडे) आणि परमेश्वर अंकुश शिंदे (रा. ब्रम्हा हॉटेलसमोर, सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नर्‍हे, शिंदेवाडी, शिवणे येथे मे २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत.
त्यांनी फिर्यादी यांची पत्नी व नातेवाईक यांना एनडीएमध्ये कायमस्वरुपी नोकरी लावून देतो,
असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देतो,
असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे मिळून एकून २८ लाख रुपये घेतले.
परंतु, त्यांना टेंडर मिळवून दिले नाही तसेच नोकरीही न लावल्याने त्यांनी पैसे परत मागितले असता टाळाटाळ केली.
त्यानंतर त्यांनी आता फसवणूकीची फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | 28 lakh fraud with the lure of job in NDA; A case has been registered against both

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Crime News | ठाण्यात शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्याकडून हत्या; फेरीवाल्यांच्या वादातून केली हत्या

MPSC Result | एमपीएससीचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला

Pune Crime News | रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल; महापालिकेची कारवाई

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या 9 आयपीएस अधिकाऱ्यांची पदस्थापना, 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या