Pune Crime News | कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या (Crime Branch Unit 5) पथकाने हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपयांची रोकड जप्त (Cash Seized) केली आहे. ही कारवाई (Pune Crime News) सोमवारी (दि.8) रात्री दहाच्या सुमारास केली.

प्रशांत धनपाल गांधी Prashant Dhanpal Gandhi (वय 4, रा. लासूरणे ता.इंदापूर जि.पुणे) याला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा (Traffic Branch), हडपसर पोलीस स्टेशन (Hadapsar Police Station) आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) द्राक्ष संशोधन केंद्राजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित ब्रिजा कार Brezza (MH 13 CK 2111) थांबवली. त्यानंतर कारची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये काही बॅगेत पैशांचे बंड्डल आढळून आले. पोलिसांनी संशयित व्यक्ती आणि कार ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर गाडीत मिळालेली रक्कम मोजली.

पोलिसांनी 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपयांची रोकड सीलबंद केली आहे. तसेच संशयित आरोपी प्रशांत गांधी याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात सीआरपीसी कलम 41 (D) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी आयकर विभागाला (Income Tax Department) माहिती दिली असून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रशांत गांधी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही रक्कम
राहत्या घरातून लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेत (Bank of Maharashtra) भरण्यासाठी घेऊन जात
असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम त्याला कर्जापोटी भरायची आहे असे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Web Title :- Pune Crime News | 3 crore 42 lakh cash seized from bags in car at hadapsar on pune solapur highway pune police crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘ते काहीही बोलू शकतात. त्यांचं ते वैशिष्ट्य’, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

Pune Police Crime News | कोटयावधीची फसवणूक करणार्‍यास अटकेपुर्वी पोलिस अधिकारी-कर्मचार्‍याचा वरदहस्त? पोलिस दलात चर्चेला उधाण

NCP Chief Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे पक्षातील स्थान काय? ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली