Pune Crime News | गोळीबार करुन लोखोंची रोकड लुटली, खेड शिवापूर मधील घटना

खेड शिवापुर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे-सातारा रोडवरील (Pune-Satara Road) सोनल वाईन्स (Sonal Wines) या मद्य विक्रीच्या दुकानात दिवसभर जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना तीन चोरट्यांनी गोळीबार (Firing) करुन लुटून (Looted) नेली. हा प्रकार रविवारी (दि.19) रात्री पावणेबाराच्या सुमारास खेड शिवापूर (Khed Shivapur) येथे घडला. या घटनेत (Pune Crime News) चोरट्यांनी 3 लाख 78 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील (Rajgad Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर हद्दीमध्ये सोनल वाईन्स नावाचे दुकान आहे. हे दुकान बंद करुन दीपक शंकर जगदाळे (रा.गराडे ता. पुरंदर) आणि कालेश्वर अगारिया हे दोघे जण दिवसभर जमलेली 3 लाख 78 हजार रुपयांची रक्कम पिशवीत ठेवून शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर चोरट्यांनी पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावळी कालेश्वर याने चोरट्यांना विरोध केला असता त्यांनी पिस्तूल काढून दोन वेळा गोळीबार करुन पैशांची पिशवी घेऊन पसार झाले.

या घटनेबाबत राजगड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे (Assistant Police Inspector Manoj Kumar Navsare) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 3 lakh 78 thousand looted by shooting incident at village shivapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhagat Singh Koshyari | पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे परखड मत, म्हणाले- ‘दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे…’

Maharashtra Politics | आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यावर शिवसेना शिंदे गट घेणार मोठा निर्णय