Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | पन्नास लाखांच्या खंडणीसाठी (Extortion) मुंबईतील तीन बांधकाम व्यावसायिकांचे (Builders) पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून अपहरण (Kidnapping) केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) तपास करून अवघ्या काही तासात श्रीगोंदा (Srigonda) येथून तिघांची सुटका करुन तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्यूनर आणि क्रेटा कार जप्त (Pune Crime News) केली आहे.

प्रवीण शिखरे, विजय खराडे, विशाल मदने (रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी श्रीगोंदा येथील एका लॉजमधून आरोपींना अटक करुन
तीन बाधंकाम व्यावसायिकांची सुखरुप सुटका केली.
याप्रकरणी अपहरण झालेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या भावाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) माहिती दिली होती. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुरुवारी दुपारी पुण्यातील मार्केटयार्ड येथून तिघांचे अपहरण केले. यानंतर आरोपींनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन त्यांच्या भावाशी संपर्क साधला.
तिघांना सोडवायचे असेल तर 50 लाख रुपये द्या असे आरोपींनी सांगितले.
तसेच व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल करुन मारहाण करीत असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी तांत्रिक तपासावरुन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीचे पाच ते सहा साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील
(Police Inspector Kranti Kumar Patil), सुनील पंधरकर
(Sunil Pandharkar), अजय वाघमारे (Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav),
विशाल मोहिते (Vishal Mohite), कृष्णा बाबर (Krishna Babar),
पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव (PSI Mohan Jadhav),
अविनाश लोहोटे (Avinash Lohote) व गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार यांनी केली.

Web Title :- Pune Crime News | 3 Mumbai builders kidnapped from Pune for ransom of 50 lakhs, released by pune police crime branch within hours; Shackles hit the three

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra State Police Sports Competition | महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम – देवेंद्र फडणवीस

Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनन लाल ड्रेस मध्ये दिसते एकदम हॉट; फोटोवर कौतुकांचा वर्षाव

MPSC Student Protest In Pune | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा; मागणीसह पुण्यातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन