मोठया वयाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्‍न लावण्याचा प्रयत्न ; मुलीच्या तक्रारीवरून आईसह मामाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बळजबरीने विवाह करणाऱ्या आई, मामासह नवरदेवाला अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन नववधुने जेजुरीतून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या आईसह नातेवाइकांनाही अटक केली.

आई सविता खरात (४२), मामा शिवाजी चितळकर (४२, दोघेही रा. मलठण, ता. दौंड ), पती रमेश घुले (वय २५, रा. कापडगाव , ता. खंडाळा, जिल्हा सातारा), सिंधू ठवरे (वय ५३, रा. पिंपळे, ता. इंदापूर) तर दादा घुले (वय ५०) आणि अलका घुले (वय ४५, दोघेही रा. कापडगाव, ता. फलटण, जिल्हा सातारा) हे दोघे बेपत्ता झाले आहेत. दरम्यान अल्पवयीन पीडित मुलीला पुण्यातील बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी, पीडित मुलीची आई सविता खरात हिच्यासह मलठण (ता. दौंड ) येथे मामाच्या घरी राहत आहे. त्यामुळे पीडित मुलगीही मलठण येथील दादोजी कोंडदेव विद्यालयात शिक्षण घेत होती. तिने नुकतीच ९ वी ची परीक्षा दिली होती. तिला दहावीचे शिक्षण घ्यायची इच्छा होती. मात्र तोपर्यंत सहा जून रोजी दुपारी १ वाजता तिचे मामा शिवाजी चितळकर, मामाची मावशी सिंधू ठवरे, आई सविता खरात यांनी तिला बोलावून घेतले आणि गावाला जाण्याच्या बहाण्याने तिला कापडगाव (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) येथे एका इसमाच्या घरी नेले. तेथे त्याच दिवशी मामा आणि आई ने रमेश घुले याच्या घरी नेले व त्याच्याशी तिचे लग्न ठरवले असून, आजच लग्न लावणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी पीडित मुलीने विरोध केला. मी १५ वर्षांची असताना १० वर्षांनी मोठ्या असलेल्या २५ वर्षांच्या मुलाबरोबर लग्न करणार नसल्याचे तिने सांगितले. मात्र तू अशीच बोलणार असल्यानेच तिला काही न सांगता थेट लग्नाला घेऊन आल्याचे सांगत नातेवाइकांनी दमदाटी केली. तिने नवरदेव आणि त्याच्या घरच्यांनाही विनवणी केली, मात्र त्यांनीही तिचे न ऐकता त्याच दिवशी लग्न केले.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ७ जूनला पती आणि पीडित तसेच त्याचे नातेवाईक जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यावर मुलीने जेजुरी गडावरून पळ काढला आणि एसटीने दौंड गाठले व थेट पोलिसात येऊन आई व नवऱ्यासह नातेवाइकांची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी