Pune Crime News | फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फ्लॅटचा व्यवहार करुन त्याबदल्यात 30 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅटचा ताबा न देता फ्लॅटची दुसऱ्याला विक्री करुन आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (PUne Police) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 22 ऑक्टोबर 2013 ते आज पर्यंत मार्केट यार्ड येथील कुमार सिद्धाचल सोसायटी (Kumar Siddhachal Society) येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत संजय धनराज कटारिया Sanjay Dhanraj Kataria (वय-60 रा. कुमार सिद्धाचल सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी मार्कट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन देविदास नारायण पिसाळ Devidas Narayan Pisal (वय-37 सध्या रा. बावधन मुळ रा. वाई, जि. सातारा) याच्यावर आयापीसी 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास पिसाळ याने त्याच्या नावावर असलेला कुमार सिद्धाचल सोसायटीमधील फ्लॅट फिर्यादी यांना विक्री केला होता. ऑक्टोबर 2013 मध्ये फ्लॅटचा व्यवहार झाल्यानंतर पिसाळ याने कटारिया यांच्याकडून चेक व रोख स्वरुपात 30 लाख रुपये घेतले. त्यानंतर कटारिया यांनी फ्लॅट नावावर करुन देण्यासाठी पिसाळ यांच्याकडे विचारणा केली. मात्र, पिसाळ यांनी टोलवाटोलवी केली. तसेच फिर्यादी यांना विक्री केलेला फ्लॅट इतर दुसऱ्याला विकून कटारिया यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

भावाच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दारु पिण्याच्या पैशावरून तरुणाचा खून, पुरंदर तालुक्यातील घटना