Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन मानसिक छळ, 30 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल; कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा (Pune Minor Girl) पाठलाग करुन तिचा मानसिक छळ करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय नराधमाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कलावधीत कोथरुड (Pune Police) परिसरात घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) मंगळवारी फिर्याद दिली आहे. यावरुन अक्षय पासुटे (वय-30 रा. हनुमाननगर, कोथरुड) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 354अ, 504, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या मुलीचा वारंवार पाठलाग केला. तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तु खुप आवडते, त्यामुळे तु मला सोडून तुझ्या आजीकडे जाऊन नको, असे म्हणत तिचा हात पकडून विनयभंग केला. (Pune Crime News)

तसेच फिर्यादी यांची मुलगी शाळेत जात असताना आरोपी अक्षय पासुटे याने तिचा पाठलाग केला.
ती मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी गेली असता त्याने तिचे दफ्तर ओढणे, डोक्याचे केस ओढून तिची छेड काढली.
मोठ मोठ्याने आय लव्ह यू म्हणत तिला मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबात फिर्यादी यांना समजले असता त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करुन मंगळवारी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर (PSI Katkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde-Dhananjay Munde | मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, पंकजा यांच्या मिश्किल टिप्पणीला उपस्थितांची दाद, ”आज पारा जरा जास्तच…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | क्रेडीटवर हायड्रोलिक मशीन घेऊन पावणे सहा कोटींची फसवणूक, महाळुंगे परिसरातील प्रकार

Mrunal Thakur Airport Look | एअरपोर्टवर ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली मृणाल ठाकूर, पाहा व्हायरल कॅज्यूअल लूक…

Shahrukh Khan Spotted At Airport | एअरपोर्टवर किलर लूकमध्ये दिसला शाहरूख खान, एका झलकसाठी चाहत्यांना लागलं वेड…