सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मध्यवतीमधील सीमा लोखंडी पत्रे लावून सील करण्यात आल्या आहेत. पत्रे लावत असताना त्याच रस्त्याने जाण्याचा एकाने हट्ट घरल्यानंतर पोलिसांनी त्याला दुसऱ्या रस्त्याने जाण्यास सांगितले. मात्र त्याने रागात पोलिसास धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. रविवारी दुपारी रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौकात घडली.

सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फैज शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमुळे गणेश पेठेतील विविध भागात लोखंडी पत्रे लावून परिसर सील करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील दोन कर्मचारयाच्या मदतीने गणेश पेठेतील गोविंद हलवाई चौक परिसरात अस्ताव्यस्त पडलेले पत्रे पुन्हा बसवित होते. त्यावेळी तिथे आलेल्या एकाने पत्रा बाजूला करुन जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला अडविले. त्याचा राग आल्यामुळे संबंधिताने पोलिस कर्मचारयाची काठी हिसकावून घेत शिवीगाळ केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता, त्याने पाटील यांच्यासह तिघांना धक्काबुक्की करुन पळ काढला. अधिक तपास उपनिरीक्षक तेजस्वी पाटील करीत आहेत.