Pune Crime News | पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमधील 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावून शूटिंग?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नामांकित रुग्णालय (Pune Hospital) आणि महाविद्यालयातील डॉक्टर महिलेच्या (Lady Doctor) बेडरूम व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावून शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या डॉक्टर आहेत. त्या कॉर्टर मध्ये राहतात. 6 जुलै रोजी त्या सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना बाथरूम व बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, अज्ञाताने बनावट चावीने त्यांचे रूमचे लॉक उघडले व आत प्रवेश केला.

त्यानंतर त्यांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने बाथरूम व बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले. यामुळे फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य झाले असून, त्यांनी याबाबत तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक माहितीनुवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस (bharti vidyapeeth police) करत आहेत.

Web Title : Pune Crime News | 31-year-old doctor at a reputed hospital in Pune shooting with hidden cameras in a woman’s bedroom and bathroom?

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Delta and Delta Plus variants चा सर्वात जास्त धोका 50 च्या पुढील लोकांना, काय आहेत सुरक्षित राहण्याचे उपाय?, जाणून घ्या

Pune Crime News | पुण्यात दोन अल्पवयीन मुलांकडून 15 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, नग्न फोटो काढून 1.75 लाख उकळले

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष