पुण्यात किरकोळ कारणावरून मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढाव्यात अन्न धान्य वाटप करण्यावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी हनिफ शरीफ शेख (वय 39, कोंढवा-खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा खुर्द येथील आयमन कन्स्ट्रक्शन इमारती येथे मित्रासोबत उभारले होते. यावेळी अचानक तेथे तिघेजण हातात चाकू रॉड घेऊन आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत आम्ही कोणालाही अन्न धान्य देऊ तुला काय करायचे असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याना बेदम मारहाण करून तिघेजण पसार झाले. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत.