Pune Crime News | वडील आणि भावाकडून महिलेची 33 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR; आळंदी रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीकडून मिळालेली पोटगीची रक्कम (Alimony) आणि सोन्याचे दागिन्यांचा (Gold Ornament) अपहार करुन फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी (Pune Crime News) महिलेने वडील (Father) आणि भावाविरोधात (Brother) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2016 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलीस ठाण्यात (Chiplun Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडील रामलाल घाशीराम कोठारी व भाऊ अरविंद रामलाल कोठारी (दोघे रा. ए.ड्यु ड्रॉप विलाज, आळंदी रोड, पुणे) यांच्या विरोधात आयपीसी 420, 406, 504, 406, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) वर्ग करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पतीपासून विभक्त राहतात.
महिलेच्या पतीने घटस्फोट (Divorce) देताना त्यांना 24 लाख रुपये किमतीचे 425 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
दिले होते. तसेच पोटगी म्हणून 9 लाख रुपये दिले होते.
पोटगीची रक्कम भावाच्या बँक खात्यात जमा केली होती.
त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे आणि दागिन्यांची वारंवार मागणी केली.
मात्र आरोपींनी फिर्यादी यांना पैसे आणि दागिने न देता फसवणूक केली.
तसेच शिवीगाळ करुन धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चिपळुन पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली.
गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने चिपळून पोलिसांनी गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग केला
आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 33 lakh fraud of woman by father and brother, FIR against both; Incident in Alandi Road area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती