पुण्यात सुरक्षित अंतर पाळण्यास सांगितल्याच्या रागातून डोक्यात घातली वीट

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात गप्पा मारत बसलेल्यांना सुरक्षित अंतर पाळण्यास सांगितल्याच्या रागातून डोक्यात वीट घालत मारहाण केल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री ही घटना येथील प्रेमनगर वसाहतीत घडली.

याप्रकरणी जयभीम नागप्पा सिन्नुरकर (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश कांबळे नावाच्या व्यक्तीवर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र शरणप्पा गायकवाड याच्यासोबत समतानगर मित्र मंडळाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी कांबळे हा त्याच्या एका मित्रसोबत त्या ठिकाणी आला. त्यावेळी फिर्यादी यांनी सुरक्षित अंतर ठेवा. या ठिकाणी न थांबता घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे कांबळे याने शिवीगाळ करून वीट उचलून त्यांच्या डोक्यात घातली. यामध्ये फिर्यादी हे जखमी झाले. मार्केटयार्ड पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like