कोयत्याचा धाक दाखवून तरूणाला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोयत्याचा धाक धखवत तरुणाला लुटण्यात आल्याचा प्रकार हडपसर  परिसरात घडला. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात घडली.

स्वप्निल भगवंत बंगले (वय १९, रा. शेवाळेवाडी ) आणि मुकेश सुनील साळुंके (वय १९, मुंढवा) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विश्वनाथ गुप्ता यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी विश्वनाथ आणि त्यांचा मित्र शिवप्रसाद हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातील एका कंपनीजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या स्वप्निल आणि मुकेशने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून १ हजार १०० रुपयांची रोकड चोरुन नेली. अधिक तपास सहायक निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like