Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना

पुणे : Pune Crime News | आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून (Murder In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

वैष्णवी महेश वाडेर (Vaishnavi Mahesh Vader) असे या दुदैवी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पी वाडेर (Kalpi Vader) हिला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) ताब्यात घेतले आहे. ही घटना ससाणेनगर येथील सिद्धीविनायक दुर्वांकुर सोसायटीत घडली. तिने आपल्याच मुलीला का मारले याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या मुलीसह या सोसायटीत ४ मार्च रोजी राहण्यास आली होती. त्यापूर्वी ती प्रतिकनगरमध्ये रहात होती.
ती बेकरी प्रॉडक्ट घरीच बनवून विक्रीचा व्यवसाय करते. ती सोमवारी हे भाड्याचे घर खाली करणार होते.
त्यामुळे घरमालक तेथे गेले, तेव्हा घर आतून बंद होते. शेजारच्या महिलेला त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले.
तिने दरवाजा वाजविल्यावर या महिलेने दरवाजा उघडला.
पण त्यांच्याशी काही बोलली नाही. तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर तिची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत
पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली.
हडपसर पोलिसांनी (Pune Police) महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या नातेवाईकांची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 4-year-old daughter stabbed to death by mother; A shocking incident at Sasanenagar in Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Offer To Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरे यांना राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची ऑफर; थेट CM उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा

Pune Crime | भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 2.71 लाखाचा मुद्देमाल जप्त