टेम्पोतून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रस्त्याच्या कडेला पीकअप टेम्पो उभाकरून काही वेळासाठी खाली उतरताच आतमधील पावणे दोन लाखांची रोकड चोरट्यांनी पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा-बुद्रूक परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मुजफ्फर व्यापारी (वय २३, रा. भीमपुरा, वॅâम्प) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फर काल सकाळी टेम्पोतून एकाला पावणेदोन लाख रुपये देण्यासाठी कोंढवा बुद्रूकमधील अश्रफनगरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला आणि खाली उतरले. उतरते वेळी त्यांनी पावणे दोन लाखाची रोकड पुढच्या शीटवर ठेवली होती. त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या टेम्पोतून रोकड चोरुन नेली. काही वेळात ते परत असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास पोलीस नाईक पवार अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like