पैसे मागितल्याने महिलेला पहिल्या मजल्यावरून खाली फेकले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून महिलेला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. सागर भीमराव तुपे (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) याला अटक केली आहे.

याप्रकरणी मंजू टिळेकर उर्फ मंजू वेताळ (वय २६, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि मंजू एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात तीन वर्षांपासून आर्थिंक व्यवहार होते.

दोन दिवसांपुर्वी सागर मंजूकडे गेला असता, तिने उरलेले ४० हजार रुपये मागितले. त्याचा राग आल्यामुळे सागरने मंजूला तुझ्यामुळे माझे नुकसान झाले आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर मंजू फोनवर बोलत असताना सागरने तिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन ढकलून दिले. त्यामुळे तिचा पाय, मणका, कंबरेचा खुबा मोडला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवाजी जाधव करीत आहेत.