पुणे : धानोरीत दुचाकीस्वार महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात आता घरफोड्यासोबतच सोन साखळी चोरटे देखील ऍक्टिव्ह झाले असून, विश्रांतवाडी भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून नेली. दोन दिवसांपूर्वी धानोरीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या धानोरी येथील मधुबन सोसायटीत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरुन धानोरीत मुलीकडे जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मंगला यांच्या दुचाकीचा वेग कमी झाल्याचे पाहून त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसका मारून तोडून नेली. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.