पुण्यात बाप-लेकाची पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कंटमेंट झोनमध्ये (रेड झोन) हातगाडीवर भाजीपाला विक्रीस मनाई केल्याच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्यास टोळक्याने धक्काबुकी केल्याची घटना येरवडा भागात घडली. पोलिसांनी बाप-लेकाला पकडले आहे. दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास येथील लक्ष्मीनगरमध्ये ही घटना घडली.

वसिम हैदरअली मोगले (वय २०) आणि हैदरअली सरदार मोगले (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे चार साथीदार फरार आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विनायक साळवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई विनायक साळवे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी लक्ष्मीनगर परिसर कंटेंमेंट झोन असल्यामुळे परिसरात हातगाडीवर भाजीविक्री करु नका, असे त्यांनी मोगले यांना सांगितले. त्याचा राग आल्यामुळे वसिम आणि हैदरअली यांनी साथीदारांना बोलावून साळवे यांच्याशी वाद घातला. त्यांना धक्काबुक्की केली. अधिक तपास उपनिरीक्षक प्रशांत किर्वे करीत आहेत.