Pune Crime News | पुण्यातील कांदा व्यापार्याला 46 लाखांचा गंडा; परदेशात निर्यात करण्याच्या नावाखाली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | श्रीलंका व इतर देशात कांदा निर्यात करतो, असे सांगून कर्नाटकातील दोघा व्यापार्याने पुण्यातील कांदा व्यापार्याची (Onion Trader In Pune) तब्बल ४६ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News )
याबाबत नर्हे येथील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) सिद्धाप्पा ए एल एस भंडारी आणि गजेद्र सिद्धप्पा (दोघे रा. आर्सिकरी जि. हसन, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्च २०२१ पासून आतापर्यंतच्या कालावधीत घडली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केटयार्डात कांदा, बटाटा विक्रीचा गाळा आहे. व्यवसायानिमित्त त्यांची आरोपींशी ओळख झाली.
आपला आर्सिकरी येथे मार्केटयार्डात गाळा असून आपण कांदा निर्यात करतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ६५ लाख रुपयांचा कांदा घेतला. तो श्रीलंकेला निर्यात करीत असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यातील त्याने वेळोवेळी काही पैसे दिले. मात्र, ४६ लाख ३३ हजार रुपये परत न
करता उडावाउडवीची उत्तरे देऊ लागले. तेव्हा त्यांनी आर्सिकरी येथे जाऊन माहिती
घेतल्यावर ते कांदा निर्यात करत नसून स्थानिक बाजारपेठेतच विक्री करत असल्याचे समजले.
तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यापार्याने फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | 46 lakhs to the onion trader in Pune; Fraud under the guise of exporting abroad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा