Pune Crime News | 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सब कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम देण्यासाठी 63 लाख 40 हजार 41 रूपये घेवुन त्यापैकी 16 लाख रूपये परत करून 47 लाख 40 हजार 41 रूपये परत न देता फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

प्रतित अशित शाह (Pratith Ashit Shah) आणि क्रितीका अशित शाह Kritika Ashit Shah (रा. सर्व्हे नं. 5/1 अ, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात राजु बबन काकड (45, रा. सी 13, प्रभा आनंद संकुल, धोंगडे मळा, नाशिक रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा ऑक्टोबर 2021 ते दि. 21 डिसेंबर 2021 दरम्यान मिलीयन्स स्टार बिल्डींग (रूबी हॉस्पीटल शेजारी, ढोले-पाटील रोड, पुणे) येथे घटना आहे. सदरील गुन्हा नाशिक उपनगर पोलिस ठाण्यातून (Nashik Upnagar Police Station) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, टेराफर्मा सुपरस्ट्रक्ट एलएलपी कंपनीचे भागीदार प्रतित शाह आणि क्रितीका शाह यांना टाटा कंपनीचे 55 कोटी 58 लाख 47 हजार 451 रूपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे असे खोटे सांगण्यात आले. (Pune Crime News)

बनावट कागदपत्र दाखवुन त्यांनी फिर्यादी काकड यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना सब कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम देण्यासाठी शाह यांनी त्यांच्याकडून 63 लाख 40 हजार 41 रूपये घेतले.
त्यापैकी 16 लाख रूपये त्यांनी परत केले. मात्र, राहिलेले 47 लाख 40 हजार 41 रूपये परत न करता त्यांचा विश्वासघात करून त्यांची फसवणूक केली. गुन्हयाचा पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 47 lakhs fraud case against two; FIR at Koregaon Park Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Kiara Advani | कियारा अडवाणीने सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल केला मोठा खुलासा

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या; विरोधात नर्स संघटनांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार