Pune : व्याजाचे पैसे देत नसल्याने तरुणाला डांबून मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – व्याजाने घेतलेले पैसे माघारी न दिल्याच्या रागातून मित्राला फ्लॅटवर डांबून मारहाण केल्याची धक्कादायक घटना रास्ता पेठेत घडली आहे.
वरद राजेश म्हेत्रे (वय २५, रा. गुरुवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि वरद एकमेकांचे मित्र आहेत. आर्थिंक अडचणीमुळे तरुणाने जानेवारीत वरदकडून टप्प्याटप्प्याने २ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर पाच महिन्यांनी तरुणाने मुद्दल आणि व्याज मिळून वरदला ३ लाख ८० हजार रुपये माघारी दिले. त्यानंतरही वरद त्याला फोन करुन तु माझे पुर्ण पैसे दिले नाहीत, अजून तुझ्याकडून पैसे येणे बाकी आहेत असे म्हणत वसुलीसाठी तगादा लावला होता.

साठी वरद त्याला सारखा फोन करुन दमदाटी करीत होता. दोन दिवसांपुर्वी वरदने एका साथीदाराच्या मदतीने तरुणाला आंबेगावच्या फ्लॅटवर नेले. त्याठिकाणी त्याला डांबून मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक विवेक पाडवी करीत आहेत.