Pune : दुचाकीची तोडफोड केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या बाप-लेकाला चौघांकडून रॉडने बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीची तोडफोड केल्याने त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या बाप-लेकाला चौघांनी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली.
रिझवान पठाण (वय ३०, रामनगर, रामटेकडी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रिझवान त्याच्या कुटूंबियासह रामनगर येथे राहण्यास आहे. दोन दिवसांपुर्वी घराशेजारील एकाने किरकोळ कारणातून त्यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यात दुचाकीचे नुकसान झाले.

त्यामुळे रिझवान व त्यांच्या वडिलांनी संबंधिताला जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे हल्लेखोराने साथीदारांना बोलावून रिझवान आणि त्यांच्या वडिलांवर रॉडने हल्ला करुन जखमी केले. अधिक तपास सहायक निरीक्षक विश्वजीत जगताप करीत आहेत.