Pune Crime News | पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीमधून लाखाचा गांजा जप्त

पुणे (Pune Crime News) / लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – Anti-Drug Squa । गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Crime Branch Anti-Drug Squad) एकास अटक (Arrest) करून त्याच्याकडून एक लाख 10 हजार रुपये किंमतीचा 5 किलो 518 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सदरची कारवाई हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आली आहे. शिवराज काशीनाथ बक्के (Shivraj Kashinath Bakke) (वय 39 रा, उस्मानाबाद) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. pune crime news | 5 kg drugs worth rs 1 lakh seized kunjirwadi pune solapur highway

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अंमली पदार्थ गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक (Crime Branch Anti-Drug Squad) पुणे – सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मराठमोळा पान शॉप समोर आले होते. तेथे शिवराज बक्के (Shivraj Kashinath Bakke) हा हातामध्ये पांढऱ्या रंगाचे नायलॉन पोते घेऊन थांबलेला दिसला. त्याच्या हालचाली गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास संशयित वाटू लागल्या. पोलिसांनी त्याच्याकडे पाहताच तो गडबडीत निघून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात पोलिसांकडून बक्के याला पकडण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी त्याच्याजवळील पांढऱ्या नायलॉन पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सापडला.
वजन केले असता, 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा 5 किलो 518 ग्रॅम वजनाचा असल्याचे निष्पन्न झाले.
सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून.
आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title :- pune crime news | 5 kg drugs worth rs 1 lakh seized kunjirwadi pune solapur highway

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर