पुण्यात पुर्ववैमनस्यातून 2 गटात हाणामारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्वी झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना फरासखाना परिसरात घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

तौफिक रियाज भोलावाला (वय १९, रा. कसबा पेठ) आणि रियाज भोलावाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अदिल भोलावाला आणि तोहीद भोलावाला अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश उर्फ गोट्या कोळी (वय २९, रा. कसबा पेठ ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश उर्फ गोट्या व भोलावाला कुटूंब एकाच परिसरात राहायला आहेत. २०१५ मध्ये तौफिकने रमेशवर कोयत्याने वार केेलेे होतेे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुुुन्ह् दाखल आहे. त्याचा राग मनात होता. या रागातून सोमवारी दुपारी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर भोलावाला कुटूंबियाला मारहाण करुन जखमी केेलेे.

तौफिक भोलावाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश उर्फ गोट्या कोळी, परवेझ सौदागार, पांग्या उर्फ समीर यांनी त्यांच्या भावाला मारहाण केली. त्याशिवाय तौफिक यांच्यासह वडिलांना वीट फेेेकुुन मारत जखमी केले. अधिक तपास सहायक निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत