पुणे : धक्का लागला म्हणून मोबाईल हिसकाविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात घरफोड्यासोबतच चोऱ्या आणि लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. खराडीत तरुणाला दुचाकीला धक्का लागला म्हणून मोबाईल व चावी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली.

राम भोसले (वय २४, रा. हडपसर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राम हे बुधवारी कामानिमित्त खराडी बायपास परिसरात आले होते. त्यावेळी मोबाईलवर बोलत असताना त्यांचा दुसऱ्या एका दुचाकीला धक्का लागला. त्यावरून त्याने राम यांना शिवीगाळ करुन मोबाईल आणि दुचाकीची चावी हिसकावून पळ काढला. अधिक तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.