हडपसरमधील महिलेचे दागिने चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दुध डेअरी चालक एका जेष्ठ महिलेचा विश्वास संपादित करुन चोरट्यांनी त्यांच्याकडीत २३ हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. हडपसरमधील फुरसुंगी भागात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी गौराबाई डोळे (वय ५७) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौराबाई यांची फुरसुंगी येथील गुरुदत्त कॉलनीत दुधडेअरी आहे. बुधवारी दुपारी त्या सव्वा एक वाजण्याच्या सुमारास त्या डेअरीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर दोघेजन त्यांच्या डेअरीत आले. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात व्यस्त केले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याजवळील ५०० रुपयांची नोट देवासमोर ठेवायला सांगितली. काही वेळाने पुन्हा ५०० नोट ताब्यात घेउन चोरट्यांनी गौराबाई यांना गळ्यातील बोरमाळ आणि सोनसाखळी काढण्यास सांगितले. सर्व दागिने नोटेत गुंडाळल्यानंतर चोरट्यांनी डेअरीतून पळ काढला. अधिक तपास सहायक निरीक्षक गाडे हे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like