Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील 6 बुक्कींना खराडी परिसरातून अटक ! IPL Cricket मॅचवर घेत होते Betting

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) खराडी परिसरातील (Kharadi) गॅलक्सी वन सोसायटीमधील (Galaxy One Kharadi) नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटवर छापा टाकून आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेणार्‍यांचा पर्दाफाश केला आहे (Six Arrested In IPL Cricket Betting). त्यामध्ये छत्तीसगड (Cricket Bookies Chhattisgarh), पंजाब (Cricket Bookies In Punjab) आणि बिहारमधील (Cricket Bookies In Bihar) 6 बडया बुक्कींचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाली आहे. पोलिसांनी 5 लाख रूपयाचा ऐवज घटनास्थळावरून जप्त केला आहे (Cricket Bookies In Pune). त्यामध्ये 16 मोबाईल आणि 2 लॅपटॉपचा समावेश आहे. (Pune Crime News)

 

गौरव दयाराम धरमवाणी Gaurav Dayaram Dharamvani (27, मुळ रा. ब्लॉक शिवानंदनगर, खमतराई, रायपुर, छत्तीसगड), सुनिश तुलशीदास लखवानी Sunish Tulshidas Lakhwani (25, मुळ रा. महाविर स्कुल, मच्छी तलावाजवळ, गुडीयारी, रायपुर, छत्तीसगड), जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा Japjit Singh Atamjit Singh Bagga ( 25, मुळ रा. सिंधी गुरूव्दाराजवळ, पांढरी आटा चक्की समोर, रायपुर, छत्तीसगड), जसप्रित मनजिंदरसिंग सिंह Jasprit Manjinder Singh (29, मुळ रा. रस्ता नं. 10, शिवाजीनगर, लुधीयाना, पंजाब), तरणदीप बलजींदर सिंह Tarandeep Baljinder Singh (33, रा. शास्त्री स्कुलवाडी गल्ली, शिवाजीनगर, लुधीयाना, पंबाज) आणि लालकिशोर दुखी राम Lalkishore Dukhi Ram (37, मुळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक आरोपींसह डीके नावाच्या बुक्कीवर देखील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, काही जण खराडी येथील एका सासोयटीमधील फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bharat Jadhav), सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote) आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिस पथकाने खराडी येथील गॅलक्सी वन सोसायटीमधील नवव्या मजल्यावर फ्लॅट नंबर ए-902 वर छापा टाकला.

 

पोलिसांना फ्लॅटमध्ये अटक आरोपी बेटिंग घेत असल्याचे आढळुन आले.
आरोपींनी बिंदीया यादव (जपजीतसिंह याची दायी) हिचे नावाचे आयडीवर कंपनीचे सिमकार्ड वापरून तिची फसवणुक केली.
आरोपींकडे आढळलेल्या लॅपटॉपमध्ये वेगवेगळ्या वेबसाईटव्दारे टाटा आयपीएल 2023 च्या
मुंबई इंडीयन्स विरूध्द लखनौ सुपर जायंट्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतले जात होते. आरोपींविरूध्द भादंवि 420, 34,
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 (अ), 5 सह भारतीय टेलीग्राफ अ‍ॅक्ट कलम 25 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 16 मोबाईल हॅन्डसेट, 2 लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि
रोख रक्कम असा एकुण 4 लाख 80 हजार 740 रूपयाचा ऐवज आढळून आला आहे. पोलिसांनी तो जप्त केला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव,
सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे (API Rajesh Malegave),
पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत (Police Havaldar Rajendra Kumawat), पोलिस हवालदार बाबा कर्पे (Police Havaldar Baba Karpe), पोलिस हवालदार भिवरकर (Police Havaldar Bhivarkar), पोलिस अंमलदार संदीप कोळगे
(Police Sandeep Kolge), पोलिस अंमलदार अजय राणे (Police Ajay Rane), पोलिस अंमलदार सागर केकाण
(Police Sagar Kekan), पोलिस अंमलदार अमेय रसाळ (Police Amay Rasal), पोलिस अंमलदार किशोर भुजबळ (Police Kishor Bhujbal),
पोलिस अंमलदार ओंकार कुंभार (Police Omkar Kumbhar) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | 6 bookies from Chhattisgarh, Punjab and Bihar were arrested from the
Kharadi area in pune by the social security branch of Pune Police’s crime branch! Betting on IPL Cricket matches

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा