शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोडयांचे सत्र सुरूच असून येथील धनकवडी येथील पंचवटी सोसायटी परिसरातील काही दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. तर, धनकवडी, बालाजीनगर येथील प्रगती पुजा भांडार दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आठ हजार ४०० रूपयांची रक्कम चोरून नेली.

या प्रकरणी खुशाल मुंदडा (वय ३१, रा. कोणार्क पार्क, रासकर पॅलेस, बिबवेवाडी) यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. बुधवारी मध्यरात्री ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या दुकानाबरोबरच या भागातील पुणे सातारा रस्त्यालगत असलेली कपड्याची दुकाने, हेअर सलून, इलेक्ट्रॉनिक्स तसेच शूजच्या दुकानांची शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना अपयश आले. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी येथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

You might also like