साडी सेंटरमधून ६२ हजारांचा ऐवज चोरीला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्याचे सत्र कायम असून, सिहंगड रोड परिसरात चोरट्यांनी साडी सेंटरचे दुकान फोडले. चोरट्यांनी ड्रेस मटेरियल, मोबाईल आणि रोकड मिळून ६२ हजारांचा ऐवज चोरुन नेला.

याप्रकरणी काजल लिम्हण (वय २४, रा. वडगाव बुद्रूक) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर काजल यांचे साडी सेंटर आहे. २ ते ३ ऑगस्टदरम्यान त्यांचे साडीचे दुकान बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून ड्रेस मटेरियल, मोबाईल व रोकड असा एकूण ६२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी दुकान उघडताना चोरी झाल्याचे काजल यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक एस. एस. घाडगे करीत आहेत.