Pune Crime News | वारजे माळवाडी येथील सराईत गुन्हेगार कार्तिक इंगवले व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 6 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्याकडे 600 रुपयांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या दुचाकीचा पाठलाग करुन रामनगर येथील वेताळ बुवा चौकात तरुणावर गोळी (Firing) झाडली. ही घटना 16 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) चार जणांवर आयपीसी 341, 387, 307, 506, 506(2), आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून 6 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Crime News) कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख कार्तिक संजय इंगवले (वय-20 रा. रामनगर, वारजे, पुणे), सनी बाळू शिंदे (वय-21 रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे), वैभव दत्तात्रय भाग्यवंत (वय-24 रा. रामनगर, वारजे) यांना अटक करण्यात आली असून ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) आहेत. तर त्यांचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. (Pune Crime News)

टोळी प्रमुख कार्तिक इंगवले याने साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी, खंडणी (Extortion), जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्ह्याचा कट रचणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, तोडफोड करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा केले आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा
अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Senior Police Inspector D S Hake)
यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांना सादर केला.
कागदपत्रांची पडताळणी करुन आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे (ACP Rukmini Galande) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके,
पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे (Police Inspector Dattaram Bagwe),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल (PSI Manoj Bagal),
पोलीस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांनी केली.

Web Title :- Pune Crime News | 6th action by Commissioner of Police Ritesh Kumar against ‘Mokka’, criminal Karthik Ingwale and his gang in Warje Malwadi.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचे आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले…

Maharashtra By-Election | चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर