Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | इव्हेंटकरीता 11 लाईट्सचे बॉक्स घेऊन एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिला. मात्र, त्यानंतर भाड्याचे 7 लाख 23 रुपये न देता साहित्याची परस्पर विक्री करुन फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक केली आहे. हा प्रकार 14 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर या दरम्यान येरवडा येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत रोहन हरिश्चंद्र अडागळे Rohan Harishchandra Adagale (वय-26 रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुजल स्नेहल जाधव Sujal Snehal Jadhav (रा. जांभळे प्लॉट, केशवनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपी सुजल जाधव याने फिर्यादी यांच्याकडून नवरात्र, कोजागीरी पौर्णीमा तसेच यानंतरच्या इव्हेंटसाठी 11
लाईट्सचे बॉक्स घेतले. तसेच त्याने फिर्यादी यांना एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या साहित्याचे 7 लाख 23 हजार रुपये भाडे न देता फसवणूक केली.
तसेच आरोपीने फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या साहित्याची परस्पर विक्री केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Malaika Arora Viral Photos | ऑल व्हाईट आउटिंग लुकमध्ये मलाइका अरोराने वेधलं चाहत्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…

Pune Crime News | WhatsApp ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण, पुण्यातील घटना