Pune Crime News | कोयता गँगमधील ७ अल्पवयीन मुले भिंतीला शिडी लावून निरीक्षणगृहातून पसार; येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | शहरातील कोयता गँगची (Koyta Gang) चर्चा विधानसभेत झाल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) कोयता गँग म्हणून ओळखल्या जाणार्‍या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला पकडले होते. त्यांची रवानगी येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राच्या (Pandit Jawaharlal Nehru Center for Industries Yerwada) बाल निरीक्षण गृहामध्ये (Children’s Monitoring Home) केली होती. त्यातील सात अल्पवयीन मुलांनी भर दिवसा संस्थेच्या सरंक्षण भितीला शिडी लावून त्यावरुन पलायन केले आहे. त्यांच्याबरोबर सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भेकराईनगर, हडपसर) हाही पळून गेला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी काळजीवाहक संतोष किसन कुंभार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८८/२३) दिली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.

 

पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांत पकडलेल्या विधी संघर्षीत मुलांना ठेवले जाते. बाल न्यायालय मंडळाच्या आदेशानुसार सौरभ वायदंडे यालाही निरीक्षणगृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या मुलांना वेगवेगळ्या सत्रांकरीता बाहेर काढले जाते. त्यावेळी या १६ -१७ वर्षाच्या ७ मुलांनी तेथील शिडी घेऊन ती भिंतीला लावली. त्यावरुन चढून जाऊन ते पळून गेले आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे अधिक तपास करीत आहेत. (Pune Crime News)

 

कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एका सराइताविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राचे निरीक्षण गृह आहे.
गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते.

 

Web Title :- Pune Crime News | 7 minors of the Koyta gang escaped from the observatory
by attaching a ladder to the wall; Incident at pandit jawaharlal nehru udyog kendra yerwada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा