Pune Crime News | धक्कादायक ! 75 वर्षांच्या सासऱ्याने लोखंडी सुरीने सुनेवर केले सपासप वार; पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे (Pune Crime News) / चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – एका 75 वर्षीय सासऱ्याने सुनेवर लोखंडी सुरीने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील (Khed taluka) संतोषनगर येथे घडला आहे. सुनेवर हल्ला (Attack) करून मोटार सायकलरून पसार झालेला सासरा पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळला आहे. सासरा आणि सून या दोघांवरही चाकण (Chakan) येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये उपचार सुरु आहेत. Pune Crime News | 75 year old father law attacked women in pune district

अधिक माहितीनुसार, राधिका मोरेश्वर येवले (वय, ३५, रा. संतोषनगर ) असे त्या सुनेचे नाव आहे. तसेच सासऱ्याचे नाव पुरुषोत्तम दगडू येवले (वय, ७५) आहे. पुरुषोत्तम येवले यांच्यावर चाकण पोलीस स्टेशनमध्ये (Chakan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी लाकडी मुठीची लांब पात्याची सुरी देखील मिळाली आहे. तर, राधिका आणि सासरा पुरुषोत्तम या दोघात मागील अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. राधिका हिला घरात राहूच द्यायचे नाही, या कारणावरून तिला सासरा पुरुषोत्तम हा त्रास देत होता. बुधवारी (16 जून) सकाळी राधिका ही घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. त्यावेळी सासरा पुरुषोत्तम हा सुनेला जीवे मारण्याच्या हेतूने पाठलाग करत गच्चीत गेला. त्यावेळी तेथे त्याने तिच्या मान, हात, गाल आणि पायावर लोखंडी सुरीने सपासप वार केले.

या हल्ल्यात (सून) राधिका या गंभीर जखमी झाल्या. सासऱ्याच्या तावडीतून सुटत राधिका गच्चीवरून खाली धावत आल्या. तिच्या पाठोपाठ सासराही खाली धावत आला. आणि दुचाकीवरून पसार झाला. यानंतर शेजाऱ्यांनी जखमी राधिकाला तात्काळ रुग्णालयात हलविले. याप्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस (Chakan Police Station) करीत आहेत.

Wab Title :- Pune Crime News | 75 year old father law attacked women in pune district

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत