Pune : लष्कर भागात पादचारी जेष्ठ महिलेचे फसवणूक करून दागिने लांबविले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लष्कर परिसरात जेष्ठ पादचारी महिलेला दोन महिलांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील 45 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास बाहेर आल्या होत्या. त्या महात्मा गांधी बस स्टॉपजवळून पायी चालत जात असताना त्यांना दोन महिलांनी सोने देण्याच्या बहाण्याने अडविले. तसेच त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील 45 हजार रुपयांची सोन्याची चैन घेऊन पोबारा केला. त्या दोन्ही महिला पसार झाल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.