धक्कादायक ! पुण्यात सख्खे भाऊ चालवत होते कारखाना, पोलिसांची धाड अन् 750 लिटर भेसळयुक्त तूप जप्त, प्रचंड खळबळ (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात भेसळयुक्त तूप बनविणारा कारखानाच पुणे पोलिसांनी उध्वस्त करत दोघा सख्या भावांना पकडले आहे. त्यांच्याकडे तबल भेसळयुक्त ७५० लिटर तूप आणि काही साहित्य असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यातूप प्रकरणाने पुणेकरांत मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सोहील मेहंदी भानोडिया व दिनेश मेहंदी भानोडिया (रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात लूटमार, घरफोड्या आणि सराईत गुन्हेगारांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त व पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देत या घटना रोखण्यास सांगितले आहे. तसेच अवैध प्रकारांकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाला वडगाव शेरी परिसरात भेसळयुक्त तूपाचा कारखाना असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट तूप बनविले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि पोलीस उपायुक्त बच्चन सिह यांनी याची खातरजमा करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. याची माहिती काढण्यात आली. त्यावेळी भानोडिया भाऊ याठिकाणी तूप बनवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज उपनिरीक्षक महाडिक व पथकातील शिंदे, कदम, बागवान, पवार, टिळेकर, पिलाने, गाडे यांच्या पथकाने येथे छापा टाकला. त्यावेळी दोघा भावांना बनावट तूप बनवताना पकडण्यात आले. पोलिसांनी येथून भेसळयुक्त 750 लिटर तूप आणि त्याचे इतर साहित्य असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कारवाईनंतर अन्न व पुरवठा अधिकार्यांना बोलवत त्यांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले.

पोलीस व अन्न व औषध प्रशासन आता या दोघांनी शहरात नेमके हे तूप कुठे विक्री केले आहे, ते कधी पासून भेसळयुक्त तूप बनवत त्याची विक्री करत आहेत याचा तपास करत आहेत. मात्र शहरात भेसळयुक्त तूप सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

उंदीर देखील सापडला
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर याठिकाणी दुधासाठी वापरले जाणारे मोठे कॅन होते. त्यातच हे तूप तयार करून विक्री केले जात असे किंवा साठवणूक होत असे. त्याची तपासणी करत असनाताना पोलिसांना या कॅनमध्ये जिवंत उंदीर देखील दिसून आला आहे. त्यामुळे भेसळयुक्त तूप तयार करताना अस्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आले.