Pune : सिगारेट न दिल्यानं चौघांनी दुकानदाराचे 3 दात पाडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिगारेट न दिल्याने चौघांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. त्यात दुकानदाराचे तीन दात पाडले आहेत. येरवड्यातील जयप्रकाशनगर येथे ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मोसीन शेख, सुधीर चंद्रकांत गवस, आकाश तुजार, ओम वाघमारे (सर्व रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हमीद अली गोहार (वय ३५, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील जयप्रकाशनगरमध्ये हमीद यांचे जनरल स्टोअर आहे. चार दिवसांपुर्वी मोसीनने हमीद यांच्या दुकानात जाउन सिगारेट मागितली. मात्र, दुकानात सिगारेट विकत नसल्याचे त्यांनी हमीदला सांगितले. त्याचा राग आल्यामुळे मोसीन हमीदच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी हमीदचा मेव्हणा भांडण सोडविण्यासाठी पुढे आला. त्यावेळी आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यानंतर झालेल्या भांडणात सुधीर, आकाश व ओम यांनी मिळून हमीदला मारहाण करीत त्याचे तीन दात पाडले. अधिक तपास उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत