Pune : तळजाई टेकडीवर डोळ्यात मिर्चीपूड टाकून तरुणाला लुटले

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मैत्रिणीसोबत तळजाई टेकडीवर फिरण्यास गेलेल्या तरुणाच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकून चोरट्यांनी त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरदिवसा हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी प्रेम जितेंद्र जामदार (वय २१, रा. हिंगणे) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रेम मैत्रिणीसोबत तळजाई टेकडीवर फिरण्यास गेला होता. त्यावेळी पाठीमागून एकजण जवळ आला. त्याने प्रेम याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. हातातील काचेच्या बाटलीने मारहाण करण्याची धमकी देउन मोबाईलसह रोकड मिळून १० हजारांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.