Pune : चिकनच्या दरवाढीवरून तोडफोड, पुण्यातील प्रकार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनानंतरही चिकनचा भाव वाढविला नसल्याच्या रागातून एका चिकन विक्रेत्या दुकानाची सत्तूराने तोडफोड करीत कामगारांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुःशृंगी परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

रफिक सलीम शेख (वय ३८, रा कस्तुरबा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगेश बोकडे (वय ३१, रा. औंध) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात रफिक चिकन विक्रेते आहेत. त्यांचे औंध येथील कस्तुरबा वसाहतीत दुकान आहे. कोरोनामुळे व्यवसायात मंदी आली आहे. यामुळे रफिकने योगेशच्या मालकाला चिकनचे भाव वाढविण्यास सांगितले होते. मात्र, तरीही त्याने चिकनचे भाव वाढविले नाहीत. याचा राग रफिकला आला होता. त्यामुळे काल सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास रफिकने तेथे येउन चिकनचा भाव का वाढवला नाही असे म्हणत दुकानाच्या काचा, पंख्याची तोडफोड केली. त्यानंतर कामगारांना मध्ये न पडण्याची धमकी दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक राजेंद्र दहिफळे करीत आहेत.