Pune : दुचाकीस्वार महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मुलीसोबत पेट्रोल भरण्यास निघेलल्या दुचाकीस्वार महिलेच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी पळविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चतुशृंगी परिसरात ही घटना काल घडली आहे. याप्रकरणी सुप्रिया कुंभार (वय 24, रा. थेऊर) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची आई गाडीत पेट्रोल भरण्यासाठी औन्ध येथील गायकवाड पेट्रोल पंपावर जात होत्या. यावेळी फिर्यादी यांच्या आईच्या हातात मोबाईल होता. यादरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेला.

त्यांनी आरडाओरडा केला. पण तोवर चोरटे पसार झाले होते. माहिती मिळताच चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.