pune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी 7 लाख 75 हजार रुपयांची “कांब” (सोने) दिल्यानंतर कारागीर ते घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रास्ता पेठेत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी जॉयनाथ माईती (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन कारागिरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे येथील श्रीकृष्ण डाय बिल्डिंगमध्ये जे. एम. ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. ग्राहकांनी सोने खरेदी केल्यानंतर त्यांच्या पसंतीनुसार ते दागिने बनविले जातात. त्यासाठी आरोपीकडे ते सोने देऊन दागिने बनवितात. दरम्यान त्यांच्याकडे दागिने बनविण्यासाठी त्यांनी पावणे आठ लाख रुपयांचे सोन्याची कांब दिले होते. 2 सप्टेंबरला त्यांनी दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र दोघेही सोने घेऊन पसार झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करत आहेत.