Pune : धनकवडी आणि विमाननगर परिसरात बंद फ्लॅट फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून धनकवडी व विमाननगर भागात बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत.

याप्रकरणी धनकवडी परिसरातील तळजाई ग्रीन सोसायटीत राहणारे राहूल विठ्ठल ढमाले (वय 34) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ढमाले हे 14 ऑक्टोंबर रोजी कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच कपाटातील 33 ग्रॅम सोन्याचे दागिने, 50 हजार रुपये रोख असा 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी ढमाले हे घरी आल्यानंतर त्यांना फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

तर दुसरी घटना विमाननगर परिसरात घडली आहे. येथे भावनगरी ड्रायफुड नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर बुधवारी रात्री उचकटून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील ४८ हजार रुपये रोख चोरून नेले. याप्रकरणी संजय वज्रलाल पारेख (वय ५८, रा. कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.