धावत्या कारने अचानक पेट घेतला, वारजेतील डुक्कर खिंडीच्या पुलावरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना वारजेतील डुक्कर खिंडीच्या पुलावर आज दुपारी घडली. हा प्रकाराने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींचा थरकाप उडाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत कार थांबविल्याने अनर्थ टळला.

साताऱ्यातील अजय बाबरन्स हे पत्नीसह मुंबईच्या दिशेने कारने चालले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वारजेतील डुक्कर खिंड जवळील उड्डाण पुलावरुन जात असताना अजय यांना कारमधून धुर निघत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तत्काळ कार थांबविली व बाहेर पडले. काही क्षणातच कारने पेट घेतला. काहीवेळ महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. ही माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मोटारीतील आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.