Pune : सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या मोटारीमधून 8 लाखांची रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट भागातील महर्षीनगर येथे सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारमधून तबल ८ लाखांची रोकड चोरून नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी प्रीयोतोष पायगुडे (वय ३७, रा. अंकुरपार्क सोसायटी, महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते महर्षीनगर येथे राहण्यास आहेत. त्यांच्याकडे कामगारांचे पैसे देण्यासाठी ८ लाखाची रोकड होती. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्या कारमध्ये रोकड ठेवली होती. तशीच कार त्यांनी त्यांच्या इमारतीच्या पार्कींगमध्ये पार्क करून ठेवली. ते घरात गेल्यानंतर कारमधील कारटेप चोरी करताना त्यांच्या हाताला ही 8 लाखांची रोकड लागली. चोरट्यानी कारची काच फोडून ही रोकड चोरी केली. हा प्रकार रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर पायगुडे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.