Pune Crime News | हडपसरमधील प्रकाश गोंधळे खून प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या 9 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसरमधील प्रकाश अण्णा गोंधळे (Prakash Anna Gondhale) खून (Murder In Hadapsar) प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या (Hindu Rashtra Sena) तब्बल 9 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर (Judge K.P. Nandedkar) यांनी दिला आहे. (Pune Crime News)

हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेडगे, राहुल कौले, विकी पाटील, सुरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांना आयपीसी कलम 302 तसेच 506(2) अंतर्गत 2 वर्षे, फौजदारी कलम 7 च्या तरतुदीनुसार 6 महिने आणि प्रत्येक आरोपीला 20 हजार रूपये दंड सुनावण्यात आला आहे. दंडाशिवाय आरोपींनी 1 लाख 50 हजार रूपये प्रकाश गोंधळे यांच्या परिवाराला द्यावी असे आदेशात सांगण्यात आले आहे. (Pune Crime News)

जून 2013 मध्ये प्रकाश गोंधळेंच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
दरवाजा पेट्रोल टाकून जाळून टाकला आणि हौदोस घातला.
त्याबाबत प्रकाश गोंधळेंनी हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली.
त्यानंतर वेळावेळी पाठपुरावा केल्यानंतर देखील गोंधळेंच्या घरावर हल्ला करणार्‍यांना अटक झाली नाही.
दि. 8 जुलै 2013 रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गोंधळे हे घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडविले आणि त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून केला. खटल्यात विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली होती. खटल्यादरम्यान न्यायाधीशांनी एकुण 19 साक्षीदार तपासले. आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment Till Death) सुनावण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime News | 9 members of Hindu Rashtra Sena sentenced to life imprisonment in Hadapsar Prakash Gondhale murder case Crime News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा देशमुखांच्या भाजप प्रवेशाला विरोध, म्हणाले – ‘… म्हणून लातूरच्या प्रिन्सची भाजपात येण्याची इच्छा’

Nitesh Rane | ‘तो फक्त सिरीयल पुरताच आहे…,’ म्हणत नितेश राणेंकडून अमोल कोल्हेंवर एकेरी शब्दात टीका