Pune : मारहाण करून कार पळवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षा प्रवासी म्हणून बसलेल्यानी रिक्षा पळविल्याचे प्रकरण समोर असताना कामावर जाण्यासाठी कारमध्ये बसत असताना त्याला मारहाणकरून सेंट्रो कार पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. लोणी काळभोर परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुदाम पंडित गोडगे (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी (दि. 26 एप्रिल) फिर्यादी हे रात्री कामावर जाण्यासाठी निघाले होते. कार पार्क केलेल्या ठिकाणी आले आणि कारचा दरवाजा उघडला असताना पाठीमागून दोघेजण आले. त्यांनी फिर्यादीला धक्का मारून खाली पाडले. ‘यहां से हिलना मत, नही तो जान से मार दुंगा’ असे म्हणत त्यांच्या ताब्यातील हुंडाई सँट्रो कार जबरदस्तीने चोरून नेली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.