Pune Crime News | खंडणीसह गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार उमेश वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 9 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खंडणी (Extortion Case) व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या उमेश मुकेश वाघमारे व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 9 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime News) केली आहे.

 

टोळी प्रमुख उमेश मुकेश वाघमारे (वय-24) मंदार संजय खंडागळे (वय-21), आदित्य लक्ष्मण बनसोडे उर्फ भुंड्या (वय-19) गणेश मारुती शिकदार (वय-19), विनायक उर्फ नंदु सुनिल शिंदे (वय-22) व एक पाहिजे आरोपीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत म्हणजे मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

आरोपी उमेश वाघमारे व त्याच्या इतर साथीदारांनी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 नोव्हेंबर 2022 रोजी एका व्यक्तीकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील हत्यारे उंचावुन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आयपीसी 307,387,341,143,144,147,148,149,506, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.

खकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव (Senior Police Inspector Sangeeta Yadav) यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल (DCP Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे सादर केला होता. प्राप्त प्रस्तावाची आणि कागदपत्रांची पडताळणी करुन मोक्का कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास फरासखाना विभागाचे (Faraskhana Division) सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे (Police Inspector Rajesh Tatkare),
सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर (PSI Atul Bankar)व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime News | 9th MCOCA Action by Commissioner of Police Ritesh
Kumaarr against Pune Criminals; Umesh Waghmare and his gang booked under mokka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा