पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | डंझो या ऑनलाईन डिलिव्हरी अॅप (Danzo Online Delivery App) कंपनीत नोकरी (JOB) लावण्याचे आमिष दाखवून 26 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी महिलेवर बलात्कार (Pune Crime News) करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपये खंडणी मागितली. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
अरिफ खान, रवी आणि रियाज अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध बलात्कार, खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 या दरम्यान घडला आहे. डंझो ही सामानाची डिलिव्हरी करणारी ऑनलाइन कंपनी आहे. पुण्यातील हजारो लोक या अॅपचा वापर करतात. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, आरीफ खान हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे.
त्याने डंझो या ऑनलाईन डिलिव्हरी अॅपमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून नोकरी लावून देतो असे सांगितले.
आरिफने पीडित महिलेला डिलिव्हरी करायची असल्याचे सांगून बोलावून घेतले.
त्यानंतर त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
याबाबत कोणाला सांगितले तर फोटो फायरल करण्याची धमकी रवी याने दिली.
तसेच महिलेकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तर रियाज याने वारंवार धमकावले.
या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | a 26 year old woman accusing was raped by luring her with an online job in danzo
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jayant Patil | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जयंत पाटील यांचा यू-टर्न; म्हणाले…
Pune Fire | पुण्यात आग्नितांडव! तीन दुकाने जळून खाक; समोर आले आग लागण्याचे कारण