×
Homeक्राईम स्टोरीPune Crime News | सुरतमधील व्यापाऱ्याला पुण्यात पिस्तूलासह अटक, तपासाबाबत लोहमार्ग पोलिसांची...

Pune Crime News | सुरतमधील व्यापाऱ्याला पुण्यात पिस्तूलासह अटक, तपासाबाबत लोहमार्ग पोलिसांची कमालीची गुप्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सुरत येथील एका कापड व्यापाऱ्याला (Cloth Merchant) पुणे लोहमार्ग पोलिसांच्या (Pune Lohmarg Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पिस्तुलासह अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी विनापरवाना पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडे केलेल्या तपासात धक्कादायक माहिती मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, पोलिसांकडून यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. (Pune Crime News)

 

अनिल कुमार उपाध्याय Anil Kumar Upadhyay (रा. सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अनिल उपाध्याय हा कामानिमित्त पुण्यात आला होता. पुण्यातील काम संपल्यानंतर तो पुन्हा सुरला जात होता. तपासणी दरम्यान त्याच्याकडे एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पिस्तुलासंदर्भात तपास केला असता ही पिस्तूल विनापरवाना असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

आरोपीने पिस्तुल आणि एवढी काडतुसे जवळ का बाळगली याचा तपास पोलीस करीत आहेत.
पिस्तुल स्वत:च्या संरक्षणासाठी जवळ बाळगली होते की इतर कोणत्या हेतू होता याचा तपास पोलीस करीत आहेत.
त्याने हे पिस्तुल कुठून आणले याचाही शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime News | A businessman from Surat was arrested with a pistol in Pune, Lohmarg police is extremely secretive about the investigation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम

Must Read
Related News