Pune Crime News | रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल; महापालिकेची कारवाई

पुणे : Pune Crime News | कसबा पेठ विधानसभा (Pune Kasba Peth Bypoll Election) मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर निकाल लागण्यापूर्वी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावणार्‍या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

राहुल भाऊ मानकर आणि अतुल नाईक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या (Pune PMC) परवाना व आकाश चिन्ह विभागाचे निरीक्षक युवराज विवेक वाघ (वय ३२, रा. धनकवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (११६/२३) दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत मतदान झाले असून येत्या २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर वडगाव भाजी मंडई परिसरात पुलावर, फुटपाथवर २० फुट बाय २० फुट इतके रवींद्रभाऊ धंगेकर यांची कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला. त्याखालील बाजूच्या काळ्या पट्टीमध्ये राहुल भाऊ मानकर व अतुल नाईक असे लिहिले होते. (Pune Crime News)

याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी व परवाना निरीक्षक अजित जोगळेकर यांनी तेथे जाऊन खात्री करुन काढून घेतला.
हे काम सुरु असताना पहाड काढत असलेल्या योगेश्वर हंबरडे याच्याकडे चौकशी केली असता अतुल नाईक
याने आम्हाला फ्लेक्स लावण्यास सांगितले, त्याने सांगितले.

कोणतीही परवानगी न घेता फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याने त्यांच्यावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

Web Title :-Pune Crime News | A case has been filed against those who flexed Ravindra Dhangekar’s victory; Municipal action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Crime News | ठाण्यात शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्याकडून हत्या; फेरीवाल्यांच्या वादातून केली हत्या

MPSC Result | एमपीएससीचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या 9 आयपीएस अधिकाऱ्यांची पदस्थापना, 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या