Pune Crime News | पुण्यातील ओशो आश्रमाच्या परिसरात गोंधळ घालणार्‍या तब्बल 130 अनुयायांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रमाच्या (Osho Commune) गेटवर बेकायदेशीररित्या जमाव जमवुन आश्रमाच्या मॅनेजमेंटच्या विरोधात घोषणाबाजी करून आश्रमात एन्ट्री करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 130 अनुयायांच्या (Osho Followers) विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्याविरूध्द दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

ओशो आश्रमाच्यावतीने धनेशकुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती (65, रा. बंगला नं. 17, ओशो आश्रम ग नं. 1, कोरेगाव पार्क, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद त्रिपाठी उर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी उर्फ स्वामी चैतन्य किर्ती, गोपाल दत्त भारती उर्फ स्वामी गोपाल भारती, राजेध वाधवा उर्फ स्वामी ध्यान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल उर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा उर्फ स्वामी अमन विस्मय, आरी राजदान उर्फ कुनिका भट्टी, न्यु इंडिया न्युजचा प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह इतर 100 ते 120 अनुयायांविरूध्द भादंवि 143, 147, 452, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिस नाईक गोकुळ कन्हैयालाल परदेशी (50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरूण विनीत रावल (27, रा. भिलाई वेस्ट, दुर्ग, छत्तीसगड) याच्याविरूध्द भादंवि 353, 332, 504 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, ओशो आश्रमाचे मॅनेजमेंट आणि अनुयायांच्यात मोठे वाद सुरू आहेत.
दि. 22 मार्च रोजी ओशो आश्रमाच्या गेटसमोर मोठया प्रमाणावर अनुयायी जमले होते.
त्यावेळी त्यांनी मोठ-मोठयाने घोषणाबाजी केली तसेच बेकायदा आश्रमात एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला.
ट्रस्टच्या सदस्य साधना (80) यांना धक्काबुक्की झाली तर न्यू इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक
(Vaibhavkumar Pathak) यांनी पत्रकार असल्याचे सांगत आश्रमात एन्टी करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपी करण्यात आला आहे.

वरूण विनती रावलने घोषणाबाजी करत धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घोतला. त्यावेळी पोलिसांनी
(Pune Police) त्यास समजावुन सांगितले. त्यानंतर देखील रावलने वाद घालून पोलिसांना धक्काबुक्की केली.
प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A case has been filed in Koregaon Park Police Station against as many as 130 followers who created chaos in the area of ​​Osho Commune Ashram in Pune.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक